अहमदनगर | नगर सह्याद्री घर बंद करून मुलाकडे पुणे येथे गेलेल्या वृद्ध व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले. घरातील संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
घर बंद करून मुलाकडे पुणे येथे गेलेल्या वृद्ध व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले. घरातील संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम असा २२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. १७ ऑटोबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान सावेडी उपनगरातील निर्मलनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी २२ जानेवारीला तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश प्रभाकर परांजपे (वय ६० रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश परांजपे यांचा मुलगा पुणे येथे राहतो. १७ ऑटोबरला त्या मुलाकडे गेले होते. २० जानेवारीला घरी आल्या असता त्यांना चोरीला झाल्याचे लक्षात आले.
COMMENTS