ब्रीड लाइनमध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिके जिंकली अहमदनगर । नगर सह्याद्री नगर - औरंगाबादच्या रोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ...
ब्रीड लाइनमध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिके जिंकली
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर - औरंगाबादच्या रोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉग शो 2023 मध्ये सहभागी झालेल्या 111 श्वानांमध्ये नगरच्या श्वानांनी डंका वाजवत पाच ट्रॉफी व ब्रीड लाइनमध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळवले. नगरचे श्वान प्रेमी मधुर बागायत यांच्या लॅब्राडोर रिट्रिव्हर जातीचा लिओ श्वान याने टॅप 10 मध्ये द्वितीय क्रमांक व लॅब्राडॉर रिट्रीव्हर जातीमध्ये लिओने सर्वोत्तम स्थान मिळाले. तसेच श्वानांच्या झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मधुर बागायत यांचाच सायबेरियन हस्की जातीची मफिन श्वान विजेती ठरली.
या डॉग शोमध्ये नगरच्या श्वान प्रेमी मर्लिन एलिशा यांचा सेंट बर्नार्ड जातीमध्ये मायलो हा श्वान पहिल्या क्रमांकावर राहिला. त्यांचीच किया श्वानाने बीगल जाती मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व गोल्डन रिट्रीव्हर जातीची प्रिन्सेस श्वान ही जातीमध्ये अव्वल राहिले.
या डॉग शोमध्ये नगरचे श्वान प्रेमी मधुर बागायत, चतुर बागायत, मर्लिन एलिशा, मनीष भोसले व आशिष भोसले सहभागी झाले होते. त्यांच्या जातिवंत श्वानांनी ब्रीड लाइनमध्ये सर्वोत्कृष्ट असण्याची बक्षिसे जिंकत उपस्थितांची मने जिंकली. मधुर बागायत व चतुर बागायत यांच्या कडे तब्बल 15 विविध ब्रीडचे जातिवंत श्वान व 55 विविध जातींचे पक्षि आहेत.
COMMENTS