अहमदनगर । नगर सह्याद्री - शहरातील पाटील हॉस्पिटलजवळ मित्रासोबत बोलणार्या युवतीसह तिच्या मित्राला पाच जणांनी मारहाण केली. युवतीला अश्लिल ...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
शहरातील पाटील हॉस्पिटलजवळ मित्रासोबत बोलणार्या युवतीसह तिच्या मित्राला पाच जणांनी मारहाण केली. युवतीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. गुरूवारी दुपारी ही घटना घडली आहे.
पीडित युवतीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.जहीर हाफीज शेख ऊर्फ बब्बु, इरफान कुरेशी ऊर्फ बिल्डर (दोघे रा. झेंडीगेट) व तीन अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या मैत्रिणीचा अपघात झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी फिर्यादी तिच्या दुसर्या मैत्रिणीसोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती.
दरम्यान हॉस्पिटलच्या बाहेर फिर्यादीला तिचा मित्र भेटला. मित्रासोबत बोलत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी फिर्यादीला मुलासोबत बोलण्याचा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण केली. तिच्या मित्रालाही त्यांनी मारहाण केली. जवळ असलेल्या एका गॅरेजमधील व्यक्तीने काहीतरी वस्तू उचलून आणली व फिर्यादी युवतीच्या डोक्यात मारून तिला जखमी केले. तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
COMMENTS