धुके आणि थंड हवेमुळे सकाळी फिरणार्यांची संख्या रोडावली अहमदनगर । नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या ...
धुके आणि थंड हवेमुळे सकाळी फिरणार्यांची संख्या रोडावली
अहमदनगर । नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून गारव्याने गारठवले आहे. धुके आणि थंड वारे असल्याने सकाळी फिरायला जाणार्यांची संख्याही रोडावली आहे.
देशातच पारा खालावला असल्याने सर्वत्र थंडी सुटली आहे. डिसेंबर महिना ओलांडला तरीही म्हणावी तशी थंडी जाणवत नव्हती. ग्रामीण भागात ते देखील वस्त्यांवर राहणार्या लोकांना रात्री उशीरानंतर गारवा जाणवत होता. शहरी लोकांना थंडीची प्रतीक्षाच होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. दिवसभर गारवा जाणवत आहे. कपाटात गुंडाळून ठेवलेले स्वेटर व उबदार कपडे यामुळे बाहेर निघाले आहेत. उपनगरांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटे थंडीसोबतच धुके पडत असल्याने मनमोहक वातावरण निर्माण झाले आहे.
देशभरातच पारा खाली उतरला आहे. उत्तर भारत पूर्णपणे थंडीच्या लाटेने ग्रासला आहे. आगामी 15 दिवसांत पारा शून्याच्या खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्याती आली आहे. दिल्लीत बुधवारी या हंगामातील सर्वाधिक थंडी होती. किमान तापमान 2.8 नोंदवले गेले. धुक्याच्या अलर्टसोबतच हिवाळ्याचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये शिमला आणि श्रीनगरपेक्षा जास्त थंडीची नोंद झाली आहे. माउंट अबू सर्वात थंड आहे. बुधवारी रात्री येथील पारा-6 अंश सेल्सिअस राहिला. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आणि जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री पारा 4 वर राहिला. मध्य प्रदेशमधील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 8 अंशांच्या आसपास गेले. बिहारमधील अनेक शहरे आणि जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे.
COMMENTS