अहमदनगर | नगर सह्याद्री मुरूम वाहतूक करणार्या डंपर मालकाने बंदोबस्तावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजयकुमार वेठेकर यां...
अहमदनगर | नगर सह्याद्री
मुरूम वाहतूक करणार्या डंपर मालकाने बंदोबस्तावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजयकुमार वेठेकर यांना मारहाण केली. गुरूवारी रात्री चितळे रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डंपरचा मालक अरूण भानुदास ढाकणे (वय ४२), एक अल्पवयीन मुलगा (दोघे रा. गणेशनगर, नगर-कल्याण रोड) व डंपरचा चालक गणेश शेषराव नागरे (वय २१ रा. गाडगीळ पटांगण, नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अरूण ढाकणे व गणेश नागरे यांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. गुरूवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत शौर्य यात्रेनिमित्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्तासाठी होते. या दरम्यान पोलीस अंमलदार वेठेकर व बबन मखरे दुचाकीवरून गस्त घालताना चितळे रोडवर डंपर चालक नागरे याने अंमलदार मखरे यांना डंपरची धडक देऊन जखमी केले. अंमलदार वेठेकर यांनी चालक नागरे याला पोलीस असल्याचे सांगून समजून सांगत असताना चालक नागरे व त्याच्यासोबतच्या अल्पवयीन मुलाने शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनी डंपर मालक अरूण ढाकणे याला फोन करून बोलून घेतले. काही वेळात अरूण ढाकणे घटनास्थळी आला. त्याने अंमलदार वेठेकर यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
COMMENTS