अहमदनगर । नगर सह्याद्री - तारकपूर बस बसस्थानकात विक्री करण्याचे उद्देशाने तीन गावठी कट्टे व नऊ जीवंत काडतुसे (किंमत 94 हजार 600 रूपये) अव...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
तारकपूर बस बसस्थानकात विक्री करण्याचे उद्देशाने तीन गावठी कट्टे व नऊ जीवंत काडतुसे (किंमत 94 हजार 600 रूपये) अवैधरित्या जवळ बाळगणारा मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला (वय 31, रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तारकपूर बस स्थानकात वाहनतळा जवळ एक व्यक्ती गावठी कट्टे व जीवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे, असे समजले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, मयुर गायकवाड, चंद्रकांत कुसळकर यांना वेशांतर करून सापळा लावण्यास सांगितले.
संशयित व्यक्तीबद्दल पथकाची खात्री होताच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयिताचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक काळे रंगाचे सॅकमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व नऊ जीवंत काडतूसे मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. मुकेश बरेला याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS