धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे केस कापून भीक मागायला लावले...

अहमदनगर । नगर सह्याद्री  शहरातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावून दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्यावर वेळोवे...



अहमदनगर । नगर सह्याद्री 

शहरातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावून दिल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. लग्नानंतर मामा-मामीने पीडित अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला मस्जिदसमोर भीक मागण्याकरिता पाठविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पीडितेचे मामा-मामी, आई-वडिल, लग्न लावणारा मौलाना व लग्न करून अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा यांच्याविरूद्ध अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अंगणवाडी सुपरवायझर भागीरथी सदाशिव बहिरवाडे (वय 55, रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस अंमलदार सलीम शेख, शिवाजी मेहर यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. 

13 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न मामाच्या मुलासोबत करण्याचा हट्ट मुलीच्या मामीने धरला होता. 22 मे 2022 रोजी सकाळी पीडितेची मामी त्यांच्या घरी आली व आई-वडिलांना म्हणाली, तुमची मुलगी व माझा मुलगा यांचा आज साखरपुडा करायचा आहे.फ पीडितेचे आई-वडिल तिला घेऊन मामाच्या घरील गेले. तेथे मौलाना हजर होता. दरम्यान पीडितेचा साखरपुडा न करता लग्न करण्याचे ठरले. त्याला आईने विरोध केला असता मामा-मामीने त्यांना लग्न करण्यास तयार केले. पीडितेचे लग्न बळजबरीने तिच्या मामाच्या अल्पवयीन मुलासोबत लावून दिले. लग्न झाल्यानंतर पीडितेसोबत अल्पवयीन मुलाने शरीरसंबंध ठेऊन अत्याचार केला. लग्नानंतर 10 ते 12 दिवसांनीच पीडितेचे सासू-सासरे (मामा-मामी) यांनी तिचे केस कापून तिला एका मस्जिदसमोर भीक मागण्यासाठी पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


COMMENTS

Name

Accident,36,Ahmednagar,7246,Akole,20,braking,44,Breaking,5120,Business,4,corona,561,Crime,1437,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1333,Epaper,29,Health,396,indan,8,India,1218,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4850,manoranjan,13,Mumbai,213,Nagar,291,Newasa,65,Parner,3022,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1264,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,132,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,127,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे केस कापून भीक मागायला लावले...
धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे केस कापून भीक मागायला लावले...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiREMM9bKSoUBtluw2xizzXS0eD4ANYcUdJakUDzeA1afmwwkAcTd2q2BO2JQPIqiukN8LJId3mpohW0JhrTFnqOU0QfOjw39Uj-nrupXCJR69oUrAPhhne8MEl0MgnxXXiKUjm8Rep8rtf9dfqXjziLb9dipXx0wE08D2eG9YpFwkrYwvoLkl2Y7zf/w640-h358/download%20(3).jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiREMM9bKSoUBtluw2xizzXS0eD4ANYcUdJakUDzeA1afmwwkAcTd2q2BO2JQPIqiukN8LJId3mpohW0JhrTFnqOU0QfOjw39Uj-nrupXCJR69oUrAPhhne8MEl0MgnxXXiKUjm8Rep8rtf9dfqXjziLb9dipXx0wE08D2eG9YpFwkrYwvoLkl2Y7zf/s72-w640-c-h358/download%20(3).jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2023/01/AHMEDNAGAR-CRAIM-NEWS_01641278309.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2023/01/AHMEDNAGAR-CRAIM-NEWS_01641278309.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content