अहमदनगर । नगर सह्याद्री नायलॉन चायना मांजावर बंदी असतांना विक्री करणार्या विक्रेत्यांवर कोतवाली पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकले. यात 37 हज...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नायलॉन चायना मांजावर बंदी असतांना विक्री करणार्या विक्रेत्यांवर कोतवाली पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकले. यात 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चेतन कन्हैय्या चिपोले (वय 35, रा. हमालवाडा),शंतनू राजेश शिंदे (वय 19, केडगाव), चेतन चंद्रकांत जंगम (वय 25, माळीवाडा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चायना मांजावर बंदी आहे. मकर संक्रात जवळ आल्याने चायना मांजा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी हे छापे टाकले.
चेतन कन्हैय्या चिपोले चेतन पतंग सेंटरमध्ये नायलॉन चायना मांज्याची विक्री करत असतांना आढळला. तसेच दुकानाची झडती घेतली असता चायना मांजा आढळून आला. 17 हजार रुपये किंमतीचे मोनाकीट काईट फायटर नावाचा नायलॉन मांजाचे 17 नग, 7 हजार रुपये किमतीचे मोनाकीट काईट कंपनीचा नायलॉन मांजाचे 10 नग असे एकून 24 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
चेतन चंद्रकांत जंगम हा महात्मा फुते रोडवर चायना मांजा विक्री करताना आढळला. त्यांच्याकडून 4 हजार रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला. शंतनू राजेश शिंदे भाग्योदय मंगल कार्यालय जवळ रोडच्या कडेला नायलॉन मांजाची विक्री करताना आढळला. त्याच्याकडून 9 हजार 600 रुपयांचा प्लास्टिक किंवा कृत्रीम पक्या धाग्याने बनविलेल्या मोनोकाईट फाईटर नाव असलेल्या 24 नायलॉन मांजाचे 24 बंडल जप्त केले.
COMMENTS