अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर मर्चंटस बँकेला उत्कृष्ट कारभाराची मोठी परंपरा आहे. ग्राहकांना कायम आधुनिक बँकींग सेवा देताना कर्ज वितरण क...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर मर्चंटस बँकेला उत्कृष्ट कारभाराची मोठी परंपरा आहे. ग्राहकांना कायम आधुनिक बँकींग सेवा देताना कर्ज वितरण करीत अर्थकारणाला चालना देण्याचे काम बँकेने सातत्याने केले आहे. हस्तीमलजी मुनोत यांच्या सारखे दूरदृष्टीचे नेतृत्व स्थापनेपासून बँकेला लाभलेले आहे. आता संजय चोपडा हे सुद्धा हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखालील मंडळात सहभागी झाले आहेत. नव्या वर्षात बँकेच्या आणखी प्रगतीचा दृष्टीने सभासदांमध्ये एक चांगला संदेश गेला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आ.जगताप, ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गांधी यांच्या पुढाकाराने बँकेतील एकमेव विरोधी संचालक संजय चोपडा सत्ताधारी हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचे मुनोत यांनी स्वागत करुन सत्कार केला. आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्वाची मानली जात आहे.
यावेळी बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक किशोर गांधी, सी.ए., आयपी अजय मुथा, अनिल पोखरणा, सी.ए. मोहन बरमेचा, संजीव गांधी, संजय बोरा, आदेश चंगेडिया, कमलेश भंडारी, अमित मुथा, विजय कोथिंबीरे्, सुभाष भांड, किशोर मुनोत आदी उपस्थित होते.
हस्तीमलजी मुनोत म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी बँकेला नेहमीच सहकार्य केले आहे. आता त्यांच्या पुढाकाराने संजय चोपडा यांचे मंडळात स्वागत करताना आनंद होत आहे. बँकेत निकोप वातावरण महत्वाचे आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
संजय चोपडा म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांचा शब्द आणि सभासदांची इच्छा याला मान देत सत्ताधारी मंडळात प्रवेश केला आहे. आपल्याला पूर्वीपासून हस्तीमलजी मुनोत यांच्या बाबत पूर्ण आदर आहे. अपक्ष संचालक असलो तरी चांगल्या निर्णयांना कधीच विरोध केला नाही. आता हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखालील काम करून बँकेच्या उत्कर्षात योगदान देण्याचा प्रयत्न राहील.
COMMENTS