अहमदनगर | नगर सह्याद्री विनापरवाना दुचाकी रॅली काढून एका समाजाच्या धार्मिक स्थळासमोर घोषणाबाजी करणार्या सुमारे १२५ ते १५० जणांविरूद्ध कोतव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
विनापरवाना दुचाकी रॅली काढून एका समाजाच्या धार्मिक स्थळासमोर घोषणाबाजी करणार्या सुमारे १२५ ते १५० जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार अभय कदम यांनी फिर्याद दिली आहे.
हिंदू राष्ट्र सेनेचे निखील धंगेकर, घनश्याम बोडखे, ओंकार घोलप, शुभम ऊर्फ परशा कोमाकुल, गामा भागानगरे, सागर ठुमणे, दर्शन अभय बोरा, आनंद राजू नायकू, मनोज औशीकर, आकाश भोसले, केशव संजय मोकाटे, रोहित सोनेकर, शिवम घोलप, ओंकार इरमल, ऋषिकेश चक्के, सिध्दांत जाधव, सनी फाटक, कार्तिक काळे, केदार रासकर, अक्षय कुमार, सागर शिवले, ओंकार बिडकर, सोनी आहेर, विशाल ठाकुर (सर्व रा. नगर व परिसर) तसेच यांच्यासोबत रॅलीत सहभागी झालेले सुमारे १२५ ते १५० जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सावेडीतील जॉगिंग पार्क येथे हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचे आयोजन केले होते. या सभास्थळी जाण्यासाठी वरील व्यक्तींनी दुचाकी रॅली काढली. यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरूवात करून माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीजमार्गे रॅली सावेडीत आली. दरम्यान फुलसौंदर चौक, पंचपीर चावडी व तख्ती दरवाजा येथील एका धार्मिक स्थळासमोर उभे राहून घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS