निघोज | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्त...
निघोज | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवीचा अंतरीम निकाल नुकताच जाहीर झाला. या शिष्यवृत्ती परीक्षेत गारखिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.५ वी तील ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
इ. ५ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी - राजदिप औटी (२३०), प्राजक्ता झिंजाड (१८२), राज झिंजाड (१६८), श्रावणी चौधरी (१६६), समृद्धी भाडळे (१५६), प्रसाद सरवरे (१३०), तनुजा झिंजाड (१२८) या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रामदास बोरुडे, प्रमोद व्यवहारे, राजु कोल्हे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
COMMENTS