दक्षिण मुंबईतील महापालिका शाळेच्या आवारात शनिवारी एका १५ वर्षीय मुलाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून पळ काढला.
मुंबई / नगर सह्याद्री -
दक्षिण मुंबईतील महापालिका शाळेच्या आवारात शनिवारी एका १५ वर्षीय मुलाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून पळ काढला. पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सहा तासांतच ताब्यात घेण्यात आले.
नागपाडा पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा त्यांना या गुन्ह्याची माहिती मिळाली. पीडित मुलगी तिच्या घराजवळ खेळत असताना आरोपींनी तिचे अपहरण केले, तिला परिसरातील महापालिकेच्या शाळेच्या आवारात नेले, तिच्यावर हल्ला केला आणि जबरदस्ती केली.
पीडित मुलगी घरी गेली, त्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना आपल्यासोबत झालेले कृत्य सांगितले. त्यांनी तिला घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी तिला तात्काळ नागपाडा पोलीस रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजचा वापर करून, पोलिसांनी संशयिताचा चेहरा ओळखला आणि त्याचे फोटो व्हॉट्सअॅपद्वारे इतर टीमला पाठवले. पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक परिसरातील रहिवाशांना देखील फोटो दाखवण्यात आले. विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही त्याला रविवारी पहाटे नालासोपारा येथे आरोपीला शोधून काढले.'
पोलिसांनी आरोपी मुलाला पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून अटक केली. आणि प्राथमिक तपासात त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर, त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉस्को) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला बाल न्याय न्यायालयात हजर करण्यात आले आणि डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
COMMENTS