भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) राजस्थानच्या श्रीगंगानगर सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे टाकलेल्या हेरॉईनच्या तीन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत, त्यात अंदाजे ६ किलो वजनाची ६ संशयित हेरॉइनची पाकिटे होती. वाहनात डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या तस्करांनी बीएसएफ जवानांवरही गोळीबार केला. मात्र, जवानांनी तस्करांच्या वाहनाला प्रत्युत्तर देत दोघांना पकडण्यात आले.
बीएसएफच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला आणि इल्लू बॉम्ब फोडले. कारमध्ये पंजाबमधून आलेल्या अन्य दोन तस्करांचा शोध सुरू आहे, मात्र पंजाब नंबर प्लेट असलेली कार जप्त करण्यात आली आहे. संशयित हेरॉईन, कार जप्त करून तस्करांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
COMMENTS