मुंबई / नगर सह्यद्री- देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्...
मुंबई / नगर सह्यद्री-
देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे.
एका वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी प्रजासत्ताक दिनी मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
आज सकाळपासूनच परेडची तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवाजी पार्कात उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेली शिवाजी पार्कात 17 चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. यात नगरविकास विभाग, सांस्कृतिक विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यावरण विभाग आदी वेगवेगळ्या खात्याची माहिती ही सर्वसामान्य लोकांना व्हावी याकरता या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानात उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची पूर्वतयारी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
COMMENTS