मुंबई । नगर सह्याद्री - शिवभोजन थाळीवर सध्या उपासमारीची वेळ १० रुपयात परवडत नाही. बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देवून त्यांची भूक भागव...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवभोजन थाळीवर सध्या उपासमारीची वेळ १० रुपयात परवडत नाही. बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देवून त्यांची भूक भागविणाऱ्या शिव भोजन केंद्र चालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शिव भोजन केंद्राचे सुमारे साठ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. परिणामी वेळेवर अनुदान न मिळाल्याने बत्तीस पैकी तब्बल पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे.
गोरगरीब, बेघर,असंघटीत कामगार अशा लोकांना अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण मिळावे या उद्दात हेतूने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात शिवभोजन केंद्रे सुरु केली आहे. या केंद्रांमुळे कोरोना काळात अनेकांना दिलासा मिळाला आहे. सध्याही मजूर, बेघर, अंसघटीत कामगारांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळतो.
सोलापूर जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने केंद्र चालकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहे. आर्थिक अडचणींमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील पंधरा शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे. तर उर्वरीत केंद्रांना ही घरघर लागली आहे. शासनाची चांगली योजना सुरु राहावी यासाठी थकीत अनुदानाची रक्कम संबंधीत केंद्र चालकांना मिळावी अशी मागणी होत आहे.
साेलापूर जिल्ह्यातील बंद झालेली शिवभोजन केंद्रे
करमाळा 2
माळशिरस 1
सांगोला 2
बार्शी 3
उत्तर सोलापूर 1
माढा 2
मंगळवेढा 1
पंढरपूर 2
COMMENTS