सांगली / नगर सहयाद्री- नोटाबंदीच्या निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झाली तरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत. १४ ...
सांगली / नगर सहयाद्री-
नोटाबंदीच्या निर्णयाला सहा वर्ष पूर्ण झाली तरी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा बदलून मिळाल्या नाहीत. १४ कोटी ७५ लाखांच्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँकेत धुळीत पडून आहेत.
रिझर्व बँकेकडून नोटा बदलून देण्यात याव्या; यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. हा निर्णय लागेपर्यंत बँकेला जुन्या नोटा सांभाळून ठेवायच्या आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी असून या जुन्या बदलुन मिळाव्यात म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लढा आता न्यायालयामध्ये सुरू आहे.
COMMENTS