२४ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १२४ कोविड पॉझिटिव्ह आढळले.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
देशात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती असताना, कोविड-१९ च्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे ११ उप-प्रकार परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आले आहेत. २४ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान १९,२२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १२४ कोविड पॉझिटिव्ह आढळले.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे नमुने आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्यात आले. तपासणीत कोरोना बाधित आढळलेल्या १२४ प्रवाशांना आयसोलेशन करण्यात आले आहे. १२४ पॉझिटिव्ह बाधितांपैकी ४० च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल आले आहेत. यापैकी, ओमिक्रॉनच्या एक्सबीबी.१ सबस्ट्रेनचे १४ नमुने आढळले. त्याच वेळी, एकामध्ये बीएफ.७.४.१ आढळले.
COMMENTS