अहमदनगर | नगर सह्याद्री- न्यायालयाचे कामकाज ई फायलिंग द्वारे चालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयास नगर जिल...
न्यायालयाचे कामकाज ई फायलिंग द्वारे चालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देले आहेत. ई फायलिंगच्या निर्णयास नगर जिल्हा न्यायालयातील सर्व वकिलांचा विरोध असून वकील संघटनेने आज या निर्णयाचा निषेध करत लाल फिती लाऊन कामकाज केले. वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या बंधनकारक निर्णयास सर्व वकिलांनी जाहीरपणे विरोध करत तसा ठराव एकमताने मंजूर करणात आला. त्या ठरव्याच्या कॉपी दिल्ली सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, नगर जिल्हा सत्र न्यायालय व महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षांना पाठवण्यात आला आहे. न्यायालयाबाहेर वकिलांनी निर्णयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी अॅड.संजय पाटील म्हणाले, न्यायालयात ई फायलिंगद्वारे दावा दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ई फायलिंगद्वारे दावा दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ, खर्चिक व गुंतागुंतीची आहे. ई फायलिंगद्वारे कामकाज करण्यासाठी वकिलांकडे अद्यावत संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, स्मार्ट मोबाईल फोन आदी आवश्यक तंत्रज्ञान नाहीये. यासर्व खर्चिक बाबी वकिलांना न परवडणार्या आहेत. येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. ई फायलिंगसाठी लागणारे इंटरनेटचा स्पीड ही कोर्टाच्या इमारतीमध्ये मिळत नाहीये. जिल्हा न्यायालया मधील वाकीलानांना या अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाहीये तसेच त्यांना ज्ञान नाहीये. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ई फायलिंगद्वारे दावा दाखल करण्याचा निर्णय बंधनकारक करू नये. सर्व वकिलांचा या निर्णयास जाहीर विरोध आहे.
यावेळी ज्येष्ठ वकील माणिकराव मोरे, अॅड.सुचिता कुलकर्णी अॅड. मीना शुक्रे यांनी निषेध करत मनोगत व्यक्त केले. यावेळी वकील संघटनेचे सचिव अॅड.गौरव दांगट, सेन्ट्रल बारचे उपाध्यक्ष अॅड.विजय भगत, माजी अध्यक्ष अॅड. भूषण बर्हाटे, अॅड.रामेश्वर कराळे, अॅड.अक्षय नजन, अॅड.आशा गोंधळे, अॅड.विक्रम वाडेकर, अॅड.युवराज पाटील, अॅड.संजय दुशिंग, अॅड.अजय गर्जे, अॅड.गोरक्षनाथ तांदळे, अॅड.रफिक बेग, अॅड.अमित गाडेकर, अॅड.संजय सुंभे, अॅड.मनीष केळगंद्रे, अॅड.प्रकाश सावंत, अॅड.रियाज बेग, अॅड.अविनाश खामकर, अॅड.अर्चना अडसरे, अॅड.वृषाली तांदळे, अॅड.भक्ती शिरसाठ आदी उपस्थित होते.
COMMENTS