मुंबई / नगर सहयाद्री - अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे, तर कधी सोशल मीडियावर दिलेल्य...
मुंबई / नगर सहयाद्री -
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे, तर कधी सोशल मीडियावर दिलेल्या हटके कॅप्शनमुळेही ती चर्चेत असते. प्राजक्ताने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कधी सोज्वळ, कधी खलनायिका, तर कधी बोल्ड भूनिकाही तिने तितयाच ताकदीने साकारल्या आहे. प्राजक्ताने आता महाराष्ट्राची फेव्हरेट खलनायिका म्हणून पुरस्कार जिंकला आहे.’पांडू’ सिनेमात प्राजक्ताने खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्याच भूमिकेसाठी तिला सर्वात्कृष्ट खलनायिका म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्यात तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे.प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली. तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांचे, प्रेक्षकांचे आणि पांडू सिनेमाच्या टीमचे आभार मानले आहेत. कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाहीबक्षिस असं म्हणत तिने खास पोस्ट शेअर केली आहे.अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ’भरभरून वोट दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार.
असचं अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशिर्वाद असू देत, हीच विनंती. मला खलनायिका म्हणून मिळेल काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला.. त्यामुळे विशेष आनंद..’ अशी पोस्ट करत तिने सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.तिने सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, टीम पांडू आणि तिची या भूमिकेसाठी निवड करणार्या विजू माने यांचेही तिने विशेष आभार मानले आहेत.
COMMENTS