पारनेर | नगर सह्याद्री - पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी स्वरांजली जगदीश...
पारनेर | नगर सह्याद्री -
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी स्वरांजली जगदीश जगदीप शिंदे हिला एम एस्सी भौतिशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्यामुळे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.स्वरांजली शिंदे ही टीवायबीएस्सी भौतिकशास्त्र विषयात २०१९ च्या च्या बॅचमध्ये ८८.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली होती. त्यानंतर तिने एमएस्सी भोतिकशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतला व एमएस्सी भौतिकशास्त्र विषयात ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विद्यापीठाकडून स्वरांजली शिंदे हीला सुवर्णपदकाने सन्मानित केले जाणार आहे.
स्वरांजली सध्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अॅण्ड नॅनो टेनॉलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे प्रोजेट असिस्टंट म्हणून काम करत आहे. नुकतीच ती पीएचडी प्रवेशासाठी आवश्यक असणारी पेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. स्वरांजली ही मूळची पारनेर तालुयातील हंगा गावची असून सर्वत्र तिच्या यशाचे कौतूक होत आहे. पारनेर महाविद्यालय हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे एक सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामधून आतापर्यंत ९५ रँक होल्डर्स सावित्रीबाई पुणे विद्यापीठात यशस्वी झालेले आहेत. हे महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देत आलेले आहे.शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाविद्यालयाची एक ठळक अशी ओळख आहे.
या यशाबद्दल स्वरांजली हिचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व संस्थेचे सदस्य राहुल झावरे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर व उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी अभिनंदन केले आहे. भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुखदेव कदम, डॉ. विजया ढवळे व भौतिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनत घेत शिक्षण पूर्ण करताना दिसून येतात. शिकण्याची जिद्द आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी धडपड, विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन आणि अनुभवी शिक्षकवृंद यामुळे पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आज कार्यरत आहेत. हे केवळ शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण वातावरण महाविद्यालयात असल्यामुळेच शय आहे. स्वरांजली आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळवून प्रथम आली त्याचे कारण महाविद्यालयामध्ये तिला मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शन हे आहे.
- माजी. आमदार नंदकुमार झावरे पाटील, अध्यक्ष जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अ.नगर
COMMENTS