अहमदनगर | नगर सह्याद्री- काटवन खंडोबा रोडवरील साई कॉलनी येथे नव्याने मोठी लोक वसाहत निर्माण झाली आहे. या परिसरातील ड्रेनेज लाईन, सांडपाणी, म...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
काटवन खंडोबा रोडवरील साई कॉलनी येथे नव्याने मोठी लोक वसाहत निर्माण झाली आहे. या परिसरातील ड्रेनेज लाईन, सांडपाणी, मैलमिश्रित व पावसाळ्याचे पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे गार्हाणे मांडल्यानंतर त्यांनी या परिसराची पाहणी केली.
परिसरामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डपके साचलेले आहे. परिसरामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रोगराई वाढली आहे. महापालिकेकडे अनेक वेळा प्रश्न मांडून झाले परंतु कुठल्याही उपयोजना केल्या नाही या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला यावेळी दिल्या आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला सूचना देत सांगितले की ड्रेनेज लाईन चा प्रश्न तातडीने हाती घ्या या भागातील नागरिक या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहे लहान मुले आजारी पडत आहे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपयोजना करा अशा सूचना दिल्या.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक अविनाश घुले, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते आदी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS