निघोज येथे नेत्र तपासणी शिबिर निघोज | नगर सह्याद्री आपल्या मतदारसंघाची घडी पुर्णपणे विस्कटली आहे. ती सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण राजकारणा...
निघोज येथे नेत्र तपासणी शिबिर
आपल्या मतदारसंघाची घडी पुर्णपणे विस्कटली आहे. ती सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण राजकारणातून निवृत्त होणार नाही असा इशारा माजी आमदार विजय औटी यांनी दिला आहे. वाढदिवस ही आरोग्य शिबीराची संकल्पना असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल व भास्करराव शिरोळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विजय औटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. भास्करराव शिरोळे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खीलारी, माजी उपसभापती बबुशा वरखडे, अध्यक्ष अनिल शेटे, माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटाच्या महिला आघाडी प्रमुख पायल पांढरकर, बाबाजी तनपुरे, वडनेरचे माजी सरपंच पांडुरंग येवले, संजय मते, संजय ठुबे, रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, रमेश वाजे, अनिल न-हे, निवृत्ती महाराज तनपुरे, अर्जुन वराळ, प्रविण चौधरी, प्रकाश पांढरकर, विशाल घोलप आदी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार औटी म्हणाले शिवसेनेने मुंबई येथे स्थापनेपासून आरोग्य शिबिर घेउन मराठी माणसाची सेवा केली आहे. तोच उपक्रम सातत्याने सुरू ठेवीत डॉटर भास्करराव शिरोळे यांनी निघोज-आळकुटी जिल्हा परिषद गटात आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर घेतले आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी तालुयात अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर घेउन चांगले सामाजिक काम केले आहे. तालुयातील परस्थीती अत्यंत बिघडली आहे. आपल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात काय झाले काय नाही याची माहिती जनतेला आहे. तालुयाची विस्कटलेली घडी जो पर्यंत व्यवस्थीत बसत नाही तो पर्यंत आपण राजकाारणातून निवृत्त होणार नाही असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
डॉटर शिरोळे यांचा सेवाभाव महत्वपूर्ण असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत निघोज गावांतून त्यांना पाठबळ देणार असल्याची ग्वाही माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी यावेळी दिली. या शिबीरासाठी दोनशे पेक्षा जास्त रुग्ण यावेळी उपस्थित होते. बाबाजी तनपुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विशाल घोलप यांनी आभार मानले. शिवसेनेचे निघोज गटप्रमुख महेंद्र पांढरकर, निघोज - आळकुटी जिल्हा परिषद गटाचे प्रमुख बाबाजी तनपुरे, आपली माती आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण, वडनेरचे माजी सरपंच पांडुरंग येवले माजी उपसरपंच रमेश वाजे व शिवसैनिकांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आठवड्यातून एक दिवस ह्दय तपासणी
या शिबिरात दोनशे पेक्षा जास्त नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच यामध्ये अनेक रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आली. ज्यांना मोतिबिंदू आहे. त्यांच्यावर अल्प दरात पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून जवळपास पन्नास पेक्षा जास्त रुग्णांना याचा फायदा मिळणार आहे. निघोज आणी परिसरातील ह्दयरोग रुण्गांसाठी आठवड्यातून एक दिवस ह्दय तपासणीसाठी नियमीतपणे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती डॉटर भास्करराव शिरोळे यांनी दिली आहे.
COMMENTS