संजय रोकडेंची सरपंचपदी वर्णी लागण्याची शयता: सरपंच मिठू शिंदे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील राजकी...
संजय रोकडेंची सरपंचपदी वर्णी लागण्याची शयता: सरपंच मिठू शिंदे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर तालुयातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा वडगाव सावताळ ग्रामपंचायत सरपंच मिठू उर्फ बाबासाहेब गुलाब शिंदे यांनी ३० ऑटोबर २०२२ रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. मात्र मी राजीनामा दिला नसल्याचे सांगून सरपंच मिठु शिंदे यांनी कांगावा केल्याने काही दिवस हा निर्णय शासन दरबारी प्रलंबित राहिला होता. अखेर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने शुक्रवार दिनांक ३० डिसेंबर रोजी या सरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी जाहीर केला असून यासाठी पळशी मंडलाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वडगाव सावताळच्या या ११ ग्रामपंचायत सदस्यांना पळशीच्या मंडळ अधिकार्यांनी लेखी नोटीस बजावली असून शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये या सरपंच पदाची निवड होणार आहे.
या अगोदर ग्रामपंचायतने आयोजित केलेल्या पडताळणी विषयी सभेला गैरहजर राहून सरपंच पदाच्या राजीनामा बाबत घुमजाव केले होते. तर या राजीनामा नाट्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होते की काय या भीतीने स्थानिक नेत्यांनी व पुढार्यांनी सरपंच मिठु उर्फ बाबासाहेब शिंदे यांच्यावर दबाव टाकून हा राजीनामा मागे घेण्यात सांगितले असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विरोधकांना गार व दिशाभूल करण्यासाठी राजीनामा नाट्याचे अस्त्र उपसले असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
वडगाव सावताळ येथील स्थानिक कुरघोडीचे राजकारण आणि आरोप प्रत्यारोपाला कंटाळून हा राजीनामा सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी गटविकास अधिकारी किशोर माने यांच्या कडे ३० ऑटोबर २०२२ रोजी विहित नमुन्यात भरून दिला आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या राजीनाम्याच्या या नोटीशीची पडताळणी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांची ७ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक लावण्यात आली होती. या संबंधीचे लेखी पत्र गटविकास अधिकारी किशोर माने यांनी ग्रामपंचायतीला पाठवण्यात आले आहे. या लेखी पत्रामध्ये मिठू उर्फ बाबासाहेब गुलाब शिंदे सरपंच, ग्रामपंचायत वडगांव सावताळ यांची दिनांक- ३० ऑटोबर २०२२ रोजीची सरपंच पदाच्या राजीनाम्याची नोटीस या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. तरी आपण मिठू उर्फ बाबासाहेब गुलाब शिंदे सरपंच, ग्रामपंचायत वडगांव सावताळ यांच्या राजीनाम्याच्या नोटीशीची विशेष ग्रामपंचायत सभा ७ नोव्हेंबर रोजी बोलावुन सभेमध्ये पडताळणी करुन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३४ अन्वये विहित कार्यवाही करुन विहीत मुदतीत राजीनाम्याची नोटीशीच्या मुळ प्रतीसह व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह या कार्यालयास समक्ष सादर करावी असे ग्रामसेविका पवार यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर गटविकास अधिकारी किशोर माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व निवडणूक शाखेकडे यासंबंधी मार्गदर्शन मागवले. त्यानुसार सरपंच मीठु उर्फ बाबासाहेब शिंदे यांचा राजीनामा मंजूर केला असून शुक्रवारी सरपंच पदाची निवड होणार आहे.
सरपंचपदी आमदार लंके समर्थक...
पारनेर तालुयातील वडगाव सावताळ येथील ग्रामपंचायत मध्ये आता सत्तांतर होणार असून ११ सदस्य पैकी ६ ग्रामपंचायत सदस्य हे लंके गटात सामील झाले आहे. त्यामुळे आमदार नीलेश लंके गटाकडून इच्छुक असणारे संजय रोकडे यांची वडगाव सावताळच्या सरपंच पदी वर्णी लागण्याची शयता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वडगाव सावताळच्या ग्रामपंचायत मध्ये शिवसेची सत्ता संपुष्टात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटाकडे ही ग्रामपंचायत जाणार असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.
COMMENTS