अहमदनगर । नगर सह्याद्री गोवर आणि रूबेलाला हरवण्यासाठी लसीकरणाची खरी गरज असल्याचे मत उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.अहमदनगर महापालिक...
अहमदनगर । नगर सह्याद्री
गोवर आणि रूबेलाला हरवण्यासाठी लसीकरणाची खरी गरज असल्याचे मत उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.अहमदनगर महापालिकेतर्फे गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहिमेचा प्रारंभ उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते.
कोरोना विषाणूचे संकट दूर होत नाही. त्यातच गोवर आणि रूबेला संसर्गजन्य आजार लहान बालकांमध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालकाचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी अहमदनगर महापालिकेने गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. नगर शहरांमध्ये पहिली फेरी 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर तर दुसरी फेरी 15 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 पर्यंत लसीकरण दिले जाणार आहे.
नागरिकांमध्ये गोवर रूबेला संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे तरी नागरिकांनी आपल्या बालकांना गोवर व रूबेलाचे लसीकरण करून घ्यावे. हा आजार संसर्गजन्य असून कोणीही हलगर्जीपणा करू नये महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. गोवर आणि रूबेलाला आपण सर्वजण मिळून हरवूया असे उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले.
आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, गोवर संसर्गजन्य आजार आहे. या आजारपणाचे लक्षणे सर्दी, ताप, खोकला, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढर्या रंगाची चट्टे दिसणे तरी नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांची संपर्क साधावा व उपचार करून घ्यावे बालकाचे नियमित लसीकरण करून घ्यावे. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये गोवर आणि रूबेला लसीकरणाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
COMMENTS