शीझानने तुनिषाचा विश्वासघात केला आणि अशा परिस्थितीत त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे.
मुंबई / नगर सह्याद्री -
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी तिच्या शोच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सदैव हसत-खेळत राहणारी तुनिशा असे पाऊल कसे उचलू शकते, याची कोणालाच खात्री नाही. एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर तुनिषाच्या आईचे मन दु:खी झाले आहे. त्याचवेळी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले दिवंगत अभिनेत्रीच्या घरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले १२ वाजण्याच्या सुमारास तुनिषा शर्माच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले. तुनिषाच्या आईची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'आम्ही तुनिषाच्या आईला भेटलो, त्यांनी आरोपी शीझान खानला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. शीझानने तुनिषाचा विश्वासघात केला आणि अशा परिस्थितीत त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे.'
२० वर्षीय तुनिषा शर्माने अली बाबा शोच्या सेटवर को-स्टार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला होता. अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा कॉस्टार शीझान खानला ताब्यात घेण्यात आले आहे. तुनिषाच्या आईने शीझानवर लग्नाचे आश्वासन देऊन आपल्या मुलीची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. ब्रेकअपनंतर तुनिशा तणावाखाली होती आणि अशा परिस्थितीत अभिनेत्रीने हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.
COMMENTS