मुंबई पोलिसांनी स्टंटचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रशियन युट्युबरला अटक केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबई पोलिसांनी स्टंटचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रशियन युट्युबरला अटक केली आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी ते तारदेव परिसरात असलेल्या इम्पीरियल ट्विन टॉवरमध्ये घुसले.
रोमन प्रोशिन (३३) आणि मॅक्सिम शेरबाकोव्ह (२५) अशी अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकांची नावे आहेत. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी रशियन वाणिज्य दूतावासाला दिली आहे. यापूर्वी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही रशियनांविरुद्ध आयपीसी कलम ४५२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS