नवी दिल्ली। नगर सह्याद्री - गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. क्रूडच्या किमतीत प्रति बॅरल सुमारे २...
नवी दिल्ली। नगर सह्याद्री -
गेल्या २४ तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. क्रूडच्या किमतीत प्रति बॅरल सुमारे २ डॉलरची वाढ दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आज सकाळी डिझेलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचला आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल १६ पैशांनी महाग होऊन 96.92 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 15 पैशांनी वाढून 90.08 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल 9 पैशांनी महागले असून ते 96.57 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे तर डिझेल 9 पैशांनी महागले असून ते 89.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोलच्या दरात 41 पैशांनी घट झाली आहे येथे पेट्रोल 112.93 रुपये इतके झाले आहे. तर डिझेल 37 पैशांनी महागले असून ते 98.11 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर
COMMENTS