पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथे श्रीदत्त जयंती निमित्त गुरुवार दिनांक 8 रोजी यात्रा भरणार असल्याची माहिती सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी दिली आहे.
सुपा । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथे श्रीदत्त जयंती निमित्त गुरुवार दिनांक 8 रोजी यात्रा भरणार असल्याची माहिती सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी दिली आहे. कळमकरवाडी येथील ग्रामदैवत महानुभाव पंथियांचे श्रद्धास्थान असणारे श्रीकृष्ण अवतार अर्थात एकमुखी दत्त मंदिर आहे. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी गुरुवार दि.8 रोजी पहाटे पाच वाजता जन्म, सकाळी ठीक दहा वाजता शेरणी वाटप, दुपारी तीन वाजता पालखी मिरवणूक तर रात्री 10 वाजता महाराष्ट्रातील अग्रगण्य मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल व शुक्रवार दिनांक 9 रोजी सकाळी तमाशा हजेरीने यात्रेची सांगता होणार असल्याचे सरपंच कळमकर यांनी सांगितले.यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून या यात्रेचा भावीक भक्त व तमाशा रसिक यांनी लाभ घ्यावा असे अवाहन सरपंच कळमकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सौ. शीतल औटी, अपेक्षा कळमकर, सोसायटी चेअरमन डी बी करंजुले, व्हा चेअरमन अप्पासाहेब कळमकर,सोसायटी संचालक गणेश कळमकर, नंदा कळमकर यात्रा कमिटीचे खजिनदार भाऊसाहेब कळमकर तसेच महानुभाव पंथाच्या वतीने रघुनाथ कळमकर, गणपत औटी,भागुजी कळमकर, राजूदादा कळमकर, साहेबराव कळमकर, भानुदास कळमकर, शहाजी कळमकर, वसंत कळमकर, गुलाब कळमकर, संजय कळमकर, देविदास कळमकर, दादा कंद यांनी केले आहे.
COMMENTS