लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक...
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री
रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. ब्रिटीशांविरोधात मंगल पांडे यांनी दिलेला लढा..., भारतभूमीसाठी सिमेवर शहिद झालेले सैनिक... हे भावनिक दृश्य विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जिवंत केले. डिजिटल इंडिया गाण्यातून सक्षम भारताचा संदेश देण्यात आला. कोळीगीत, इंडिया वाले गाण्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला. भांगडा व गरबा नृत्यातून मुलांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडविले.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम.एम. तांबे यांच्या हस्ते झाले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार निलेश लंके यांचे वडील आदर्श गुरुजी ज्ञानदेव लंके, शिक्षण उपसंचालक रमाकांत काटमोरे, प्राचार्य बाळासाहेब कर्डिले,जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अनिल साळुंखे, अर्जुनराव पोकळे, शिवाजीराव भोर, विश्वासराव काळे, कैलास मोहिते, विष्णुपंत म्हस्के, पोपटराव इथापे,शामराव व्यवहारे, विभागीय अधिकारी टि.पी. कन्हेरकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एल. ठुबे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी पारंपारिक शिक्षणाला अद्यावत शिक्षणाची जोड देऊन गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गुणवत्तेमुळे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत चमकत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य एम.एम. तांबे म्हणाल की, देशात सोशल मीडियातून तुच्छतावाद पसरला आहे. या तुच्छतावादामुळे कट्टरतावाद निर्माण होत आहे. स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगण्यापेक्षा इतर धर्मांना सोशल मीडियातून तुच्छ लेखण्याचे काम सुरु आहे. जात, धर्म, पंथाच्या नावावर तुच्छता वाद सुरू असून, यामुळे भावी पिढी धोयात आली आहे. महापुरुषांचा अपमान देखील या तुच्छता वादामुळे होत आहे. तुच्छतावादातून निर्माण झालेल्या कट्टरतावादामुळे लहान मुलांचे भवितव्य धोयात आले आहे. एक अंगी विचार मांडणार्या सोशल मीडियापासून मुलांना लांब ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, बहुजन समाजाला घडविण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था करीत आहे. स्पर्धेत गुणवत्तेला प्राधान्य देऊन संस्थेतील सर्व शाळांची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानदेव लंके यांनी रयत शिक्षण संस्थेमधून कर्मवीरांचे विचार पेरले जात असून, बहुजन समाज घडत असल्याचे स्पष्ट केले. अर्जुन पोकळे म्हणाले की, शासनाने शिक्षण क्षेत्रातून अंग काढून घेतल्याने खासगीकरणाला चालना मिळाली. यामुळे गुणवत्तापूर्ण सरकारी शाळा बंद पडल्या.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. लावणीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले.
COMMENTS