शिरूरच्या व्हीजन केअरमुळे युवराज पाहू लागला: प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकरांच्या प्रयत्नांना यश पारनेर | नगर सह्याद्री जुन्नर तालु...
शिरूरच्या व्हीजन केअरमुळे युवराज पाहू लागला: प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकरांच्या प्रयत्नांना यश
जुन्नर तालुयातील आळेफाटा येथील ११ वर्षीय युवराज क्षिरसागर दिवाळीत फटाके फोडत असताना त्याने एक सुतळी अॅटमबॉम्ब डोळ्या समोर फुटल्याने त्यास अंधत्व आले. मात्र युवराजसाठी शिरुर येथील व्हीजन केअर चे सर्वेसर्वा प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर यांच्या अथक प्रयत्नातुन त्यास परत दृष्टी आली. त्यामुळे या बालचित्रकारास व त्याच्या कुटुंबियांसाठी दोन बोटे आकाश राहिले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोणत्याही कलेचा आविष्कार ती कला साकारणार्या कलाकाराप्रमाणेच इतर लोकांनाही आनंद देणारा असतो. चित्रकला त्यापैकीच एक होय. अनेक चित्रकारांसाठी ही कला समाधान, आनंदासोबतच उत्पन्नाचं साधन देखील असते. मात्र ही कला लहान वयातच युवराजला अवघत आहे. अगदी मोनालिसा चे देखील चित्र जसे च्या तसे परत त्याने काढले आहे. काळाने त्यावर घाला घालत दिवाळीत सुतळी फटाका फुटताना दोन्ही डोळ्यांमध्ये फुटला आणि त्यास अंधत्व आले. मात्र युवराज साठी देवरूपी असणारे व्हीजन केअर चे सर्वेसर्वा डॉ.स्वप्नील भालेकर यांच्या अथक प्रयत्नातुन त्यास परत दृष्टी आली.
ही गोष्ट आहे आळेफाटा (ता.जुन्नर) येथील युवराज क्षिरसागरची. इयत्ता सहावीत तो शिकत असुन त्याला बालपणापासून चित्रकलेची आवड आहे.
वय वर्ष मात्र ११. जसे वय वाढत आहे तशी त्याच्या कलेला मोठी उंची लाभत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अनेक खेळाडुंचे त्याने अनेक चित्र रेखाटली. चित्रकलेतील विशेष प्राविण्यबद्द्ल त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. मात्र हे सर्व होत असताना दिवाळीत फटाके फोडत असताना त्याने एक सुतळी अॅटमबॉम्ब लावला. पंरतु तो मधेच विझल्याने त्याने जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतानाच त्याचा स्फोट झाला. डोळ्यासमोरच तो फटाका फुटल्याने त्याला अंधत्व आले. त्याच्या कुटुंबियांनी तातडीने नारायणगाव येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर शिरूर येथील व्हीजन केअर सेंटर मध्ये आणण्यात आले. तेथील डॉ.स्वप्नील भालेकर, डॉ. सोनाली भालेकर व त्यांच्या टीमने दोन महिने अथक प्रयत्न करून त्याला शंभर टक्के दृष्टी मिळवून दिली. दृष्टी मिळताच त्याने सुंदर डोळ्यांचे चित्र रेखाटुन डॉ. भालेकर यांना भेट दिले.
COMMENTS