अहमदनगर / नगर सहयाद्री जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या नगरशहराला सध्या दिवसआड किमान एक तास पाणी पुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही प...
अहमदनगर / नगर सहयाद्री
जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या नगरशहराला सध्या दिवसआड किमान एक तास पाणी पुरवठा होत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही.मात्र आता, फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम झाल्यावर नव्या पाईपलाईनवर नळ कनेक्शन दिले जाणार आहे.अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी नव्या वर्षाचे अनोखे गिफ्ट मिळाले असून शहरवासीयांना मुबलक पाणी वापरता येणार आहे.येत्या मार्च महिन्यापासून २४ तास पाण्याची सुविधा होणार असल्याने अहमदनगरकरांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. याबाबतची माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
अहमदनगर शहरासाठीच्या अमृत पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले असून येत्या जानेवारी अखेरपर्यंत योजनेसाठी लागणारे पंप आणि मोटारी बसवल्या जाणार आहेत.मार्च २०२३ पासून नव्या जलवाहिनीवरून नगरकरांना नळ कनेक्शन देऊन २४ तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.
मार्चपर्यंत आपण नगरकरांना २४ तास पाणी पुरवठा करणार आहोत असं सुजय विखे पाटील यांनी सांगितले.अमृत योजनेत मुळा धरणापासून वसंत टेकडीपर्यंत पाईप टाकण्याचे काम अवघे १२ मीटरचे शिल्लक आहे.खासगी जागेतून हे काम होणार असल्याने संबंधितांशी बोलून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला.
COMMENTS