महाविद्यालयीन कार्यक्रमात नृत्य करताना विद्यार्थ्यांनी बुरखा परिधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
कर्नाटकातील मंगळुरू येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर नृत्य करताना विद्यार्थ्यांनी बुरखा परिधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
डान्स व्हिडिओ अनेक वापरकर्त्यांनी शेअर केला. डान्समध्ये बुरखा आणि हिजाबची थट्टा केल्याचा आरोप झाल्यानंतर वाद निर्माण झाला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नृत्याला अयोग्य म्हटले कारण त्यात 'अश्लील स्टेप्स' होत्या.
या प्रकरणी कॉलेज व्यवस्थापनाने ट्विटद्वारे विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. तसेच प्रसिद्धीपत्रक जारी केले. मंगळूर स्थित सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप हा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. चारही विद्यार्थी मुस्लिम समाजातील आहेत. या चार विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आरोप कॉलेज व्यवस्थापनाने केला आहे. हा कार्यक्रमाचा भाग नव्हता आणि चारही विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. महाविद्यालय अशा कोणत्याही उपक्रमास समर्थन देत नाही. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर एम यांनीही निवेदन जारी केले आहे.
विद्यार्थ्यांना निलंबित केल्यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी विद्यार्थ्यांना निलंबित का करण्यात आले असा प्रश्न विचारला. "बुरखा हा पवित्र पोशाख नाही?, की इस्लाममध्ये नृत्य निषिद्ध आहे म्हणून?" तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "जर बुरखा घालणे चुकीचे नसेल तर बुरखा घालून नाचण्यात काय गैर आहे?"
This is from #Mangaluru, #Karnataka.
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 7, 2022
In an Event at St.Joseph Engineering College, Mangaluru students seen wearing #Burkha and performing obscene steps for a item song mocking #Burqa & #Hijab.#DakshinKannada #Mangalore #StJosephEngineeringCollege pic.twitter.com/Q6jmN5p77F
COMMENTS