पुणे द्वितीय, जळगाव तृतीय तर नगर चौथ्या क्रमांकावर: दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप पारनेर | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य व्हॉलीब...
पुणे द्वितीय, जळगाव तृतीय तर नगर चौथ्या क्रमांकावर: दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशनच्या वतीने पारनेर क्रीडा संकुलावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुष गटात मुंबई तर महिला गटात सोलापूरने बाजी मारली आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनात पारनेर येथे आयोजित डायरेट व्हॉलीबॉल प्रमोशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य अजिंयपद राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीत महिला गटात सोलापूर तर पुरुष गटात मुंबई संघ विजयी ठरले. पुणे जिल्ह्याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तर, जळगाव तृतीय तर अहमदनगर जिल्हा चौथ्या स्थानावर राहिला.
पारनेर शहरातील क्रीडा संकुलावर अत्याधुनिक मैदानाची निर्मिती करत आमदार निलेश लंके यांच्या सहकारांनी या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयोजन करुन नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या स्पर्धे दरम्यान
उपांत्य व अंतिम फेरीचे सामने अतिशय रोमहर्षक व अटीतटीचे झाल्याने पारनेरकरांनी त्याचा थरार अनुभवला. यावेळी आमदार नीलेश लंके, व्हॉलीबॉल संघटनेचे शरद कदम, प्रा. बबनराव झावरे, प्रा. संजय लाकुडझोडे, अशोक कटारिया, नगराध्यक्ष विजय सदाशिव औटींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, जयवंत साळुंखे, चंद्रभान ठुबे, नगरपंचायतीचे सभापती योगेश मते, सभापती नितीन आडसुळ, हिमाणी नगरे, डॉ. सादिक राजे, बबन चौरे, विजय डोळ, डॉ. बाळासाहेब कावरे, दिपक लंके, नगरसेवक भुषण शेलार, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, शरद कटारिया, जयवंत साळुंखें, संदिप चौधरी, नगरसेवक श्रीकांत चौरे, विजय डोळ, बायस रावसाहेब, हिलाल सर, मुस्ताक शेख, राजेंद्र तांबे, बापुराव होळकर, सुदाम दळवी, नितीन गांधी, बांडे सर, संपत गुंड, गवते सर, वाघे सर, विरेंद्र पवार सह शिक्षक वृंद व नगरसेवक नगरपंचायत पदाधिकारी हजर होते.पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या दोन दिवशी राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसर्या दिवशी दुपारच्या सत्रानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या जिल्हा प्रथम क्रमांक तर अहमदनगर जिल्हा दुसरा क्रमांकावर आला. यात सोलापूरच्या अर्शिया इनामदार, अल्फिया शेख, अनम रंगरेज, मुन्नजा रंगरेज साजिया इनामदार, सिमरन शेख यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून विजय मिळविला. तर पुरुष गटात मुंबई संघाने पुण्याच्या संघाला धुळ चारीत प्रथम क्रमांक मिळविला. यात मुंबईच्या हर्षलचा खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्याने मारलेल्या स्मॅशला परतविणे विरोधी संघाला शय होत नव्हते.दोन दिवशीय या स्पर्धे दरम्यान अनेक नामांकित व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी क्रिडा शौंकीनांचे दाखवून डोळ्याचे पारणे फेडले आहे.
८१ वर्षीय माजी आमदार भानुदास
मुटकुटे व्हॉलीबॉल मैदानात..
८१ वर्षाचं वय आणि ह्या वयात व्हॉलीबॉल खेळताना पाहून इतरांना नवी ऊर्जा,स्फूर्ती मिळते असे तरुणाईचे प्रेरणास्थान श्रीरामपूरचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी रविवारी सकाळी ११ वाजता पारनेर येथील चालू असलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेस भेट देऊन खेळण्याचा आनंद घेतला. आ. मुरकुटे साहेबांचे आज वय पाहता आजही तरूणाई सारखा तोच जोष आणि अंगात रग आहे.नक्कीच त्यांची खेळाप्रति असणारी ऊर्जा,आवड पाहून मला मनोमन आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.तर जिल्ह्यातील राजकीय आखाड्यातील खेळाडू या ८१ वर्षाच्या वयात व्हॉलीबॉल मैदानात उतरून खेळ दाखवल्याने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
ये तो् ट्रेलर..पिचर अभी बाकी है -आमदार लंके
आ. नीलेश लंके म्हणाले की, डायरेट प्रमोशन व्हॉलीबॉल असोसिएशन मार्फत घेण्यात आलेली ही पहिलीच स्पर्धा असल्याने काही त्रुटी राहिल्या असतील तर येणार्या भविष्यकाळामध्ये त्या दुरुस्त केल्या जातील. कोणीही नाराज होऊ नका. यह तो ट्रेलर है, पिचर अभी बाकी है | तसेच या संघटनेला येणार्या काळात उंचीवर नेऊन तिचा प्रचार व प्रसार करायचा आहे. त्यासाठी पारनेर तालुयातील ज्या-ज्या गावात व्हॉलीबॉल खेळणारे संघ असतील त्यांना एक नेट व व्हॉलीबॉल संघटनेमार्फत भेट देण्यात येणार आहे. याप्रसंगी जुन्या काळातील व्हॉलीबॉल खेळाडू अशोकशेट कटारीया यांनी सामन्याचे धावते वर्णन करून सामन्यांमध्ये रंगत आणली होती.
COMMENTS