दुतोंडी गांडूळाच्या फोटोंची माळ घालून जाहीर निषेध अहमदनगर । नगर सह्याद्री उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत रोज वादग्रस्त भूमिका घेत अकलेचे ता...
दुतोंडी गांडूळाच्या फोटोंची माळ घालून जाहीर निषेध
अहमदनगर । नगर सह्याद्री
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत रोज वादग्रस्त भूमिका घेत अकलेचे तारे तोडत आहेत. महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चा पूर्णतः अपयशी ठरला. तीनही पक्षांनी मिळून एकत्रित आंदोलन पुकारूनही मुंबईतील मोर्चाला अपेक्षित गर्दी जमवता आली नाही. मुंबई आमचीच आशा वल्गना करणान्या उद्धवसेनेला ही मोठी चपराक व जिव्हारी लागणारी गोष्ट आहे. या वैफल्यातूनच संजय राऊत यांनी मुंबईतील हल्लाबोल मोर्चाचे नसलेले विराट स्वरूप दाखवण्यासाठी गर्दी असलेल्या मोर्चाचा व्हिडिओ प्रसारित केला.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की हा व्हिडिओ 2017 साली मुंबईत निघालेल्या अतिभव्य ऐतिहासिक अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चाचा हा व्हिडिओ होता. मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी अतिशय शिस्तबद्ध रीतीने मुंबईत काढलेला हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा ठरला होता. हल्लाबोल मोर्चातही अशीच गर्दी झाल्याचा दिखावा करण्यासाठी संजय राऊतांनी चक्र ज्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडिओचा आधार घेतला त्या मोर्चाांनाच 25 सप्टेंबर 2016 रोजी दैनिक सामना मधून मुका मोर्चा म्हणून हीणवले होते.
ज्या मोर्चाना मुका मोर्चा म्हणून हिणवले त्याच मोच्यांचा आधार घेण्याची वेळ संजय राऊत आणि उद्धव सेनेवर यावी यापेक्षा मोठी नामुष्की नाही. दुसर्या बाजूने अशा पद्धतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचा व्हिडिओ प्रसारित करून संजय राऊत यांनी अखंड मराठा समाजास व मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विविध जातीसमूहांच्या जखमेवर मीठ, चोळण्याचे काम केले आहे. उद्भव सेनेच्या संजय राऊत यांच्या लफंगेगिरीचा जाहीर निषेध: करतो. संजय राऊत यांच्या या कृतीतून उद्धवसेनेची आता पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची क्षमता राहिलेली नाही हेही सिद्ध झाले आहे. संजय राऊत ही व्यक्ती दररोज महिन्या सरड्याप्रमाणे रंग बदलताना तर कधी गांडुळासारखे दुतोंडीपणा करताना पाहायला मिळते.
मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच संजय राऊतने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असं वक्तव्य करून घटनाकारांच्या जन्मस्थदाबाबत संभ्रम निर्माण करून भावना दुखविल्या आहेत. हेन संजय राऊत महामानवांचा अवमान झाला म्हणून एकीकडे बोब ठोकतात तर दुसरीकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचंड बदनामी असलेल्या हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया वा जेम्स लेनच्या पुस्तकाचे 7 सप्टेंबर 2003 रोजी दैनिक सामना मधून कौतुक छापून आणतात. हा तर दूतोंडी पणाचा कळस झाला.
महामानवांच्या अवमानाबद्दल आवाज उठवायचे नाटक करायचे तर दुसरीकडे त्याच महामानवांच्या बदनामीचे कौतुक करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ते वंशज असल्याचे पुरावे मागायचे, अशी दुटप्पी व रंग बदलणारी असंख्य उदाहरणे संजय राऊतांच्या वागण्यातून आपल्याला रोज पाहायला मिळत आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांचे तर सोयरसुतक नसल्याप्रमाणे राऊत आणि उद्धव सेनेचे कारणामे सध्या पाहायला मिळत आहेत.हिंदू देव देवतांबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल अतिशय हिनक्स आक्षेपार्ह वक्तव्य करणान्या सुषमा अंधारेला पाठीशी घालून मिरवायचं कामही हे लोक करत आहेत.
संजय राऊत व उद्धव सेनेच्या या नौटंकीबाज, नाटकी धोरणाचा आज अहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने पुतळ्याला गहिरे सरडे व दुतोंडी गांडूळ यांच्या चित्रांची माळ घालून निषेध नोंदविताना बाळासाहेबांच्या शिवसेनापक्षाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील समवेत जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, अहमदनगर प्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख अमोल पाठक, सोमनाथ माने, लालाभाई शेख, बाबू भोर, गोरख आढाव, अमोल पाठक, शुभम भोंदे, बापू गोरे, सत्यम गुंड, राम झीने, आदिनाथ चदे, गोरख राठोड, संतोष पाचारणे, बंडू इतापे, दीपक शिंदे, अजित भोर, विपुल गोळे, गणेश गोळे, विकास शिंदे, ऋतिक दरेकर आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS