नगर सह्याद्री / मुबंई वृत्तसंस्था महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहेत. कारण, महाराष्ट्राला इंचरभरही जमीन द...
नगर सह्याद्री / मुबंई वृत्तसंस्था
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहेत. कारण, महाराष्ट्राला इंचरभरही जमीन देणार नाही या भूमिकेचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुरूच्चार केलाय. इतकंच नाही तर याबाबत कर्नाटक सरकार विधिमंडळात ठराव देखील मांडणार असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे.मंगळवारी (२०डिसेंबर) कर्नाटक सरकारची विधानसभेत बैठक झाली.या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर चर्चा करण्यात आली.या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नाबाबत दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर करून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संपलेला आहे, महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही,असं बोम्मई यांनी ठामपणे सांगितले.तसेच यापूर्वी देखील अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले आहेत. याच भूमिकेचा पुनरूच्चार करणारा ठराव पुन्हा मांडण्यात येईल, असंही बोम्मई यांनी स्पष्ट केलं आहे.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेल्या या भूमिकेला. विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते सिध्दरामय्या यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून येण्याची चिन्ह आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाप्रश्नावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती.त्यात सहभागी झाल्याबद्दल सिद्धरामय्या यांनी बोम्मई यांच्यावर टीका केली होती.सीमाभागांवर कोणत्याही राज्यांची दावा करू नये,असा सल्लाही अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे वारंवार सीमावादावर टोकाची भूमिका घेताना दिसून येत आहेत.दुसरीकडे महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्याच्या निर्णयाचेही कर्नाटकातील सर्वपक्षीय नेत्यांनी समर्थन केले आहे. सीमाभागातील जनतेच्या हिताचे रक्षण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
COMMENTS