कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूड कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांनी स्थळही फायनल केले आहे. असे म्हटले जात आहे की, याआधी हे दोघे दिल्लीत लग्न करणार होते, मात्र आता ते चंदीगडमध्ये लग्न करणार आहेत. त्याचबरोबर लग्नातील पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. लग्नाच्या बातमीवर सिद्धार्थ आणि कियाराचे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या यादीत पहिले नाव करण जोहरचे आहे. त्याच वेळी, कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या काही जवळच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देखील आमंत्रित करू शकतात. याशिवाय विकी कौशल, कतरिना कैफ, वरुण धवन, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग,अश्विनी यार्दी यांनाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाचे ठिकाण निश्चित झाले आहे. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही होणार आहे. मात्र, लग्नाच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पण सिद्धार्थ कियाराच्या लग्नाची बातमी ऐकून चाहते खूप उत्सुक आहेत.
COMMENTS