नवी मुबंई / वृत्तसंस्था बॉलिवूडसाठी २०२२ खूप खास होते.येणार वर्ष सुद्धा असेच असणार आहे.बऱ्याच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडणार असल्याच्या बातम...
नवी मुबंई / वृत्तसंस्था
बॉलिवूडसाठी २०२२ खूप खास होते.येणार वर्ष सुद्धा असेच असणार आहे.बऱ्याच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडणार असल्याच्या बातम्या येत आहेत.गेले काही दिवस कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.परंतु काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि कियारा फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या घरी गेले होते.त्यांच्या लग्नाला कोण असणार,लग्न कुठे होणार याविषयीच्या बातम्यांनी जोर धरला होता.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तसेच ही बातमी खरी असल्याचा दावा देखील केला आहे.दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा ६ फेब्रुवारी २०२३ला लग्नबंधनात अडकणार आहेत.४ फेब्रुवारीपासून त्यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत.कियारा आणि सिद्धार्थचे लग्न अत्यंत कटेकोट सुरक्षा व्यवस्थेत राजस्थान येथील आलिशान जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे.
कियाराचा नुकताच 'गोविंदा नाम मेरा' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.कियारा कार्तिक आर्यनसह 'सत्यप्रेम की कथा' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शेरशाह'नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीची वेबसीरीज 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये दिसणार आहे.
COMMENTS