शेवगाव | नगर सह्याद्री शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी तहसील कार्यलयात मतमोजणी झाली. १२ पैकी राष्ट्रवादीने ७, भाजपन...
शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी तहसील कार्यलयात मतमोजणी झाली. १२ पैकी राष्ट्रवादीने ७, भाजपने ३ आणि जनशक्ती व स्थानिक आघाडीने प्रत्येकी एका ठिकाणी यश मिळविले.
तालुयातील खानापूर येथे राष्ट्रवादीचे मंगेश थोरात गटाने बाजी मारली असून सरपंचपदी शीतल मंगेश थोरात विजयी झाल्या. प्रभुवाडगाव येथे राष्ट्रवादी-भाजपा प्रणित मंडळाच्या सरपंचपदी घोडेराव ज्ञानेश्वर विजयी होऊन ९ पैकी ८ जागा मिळविल्या आहेत. खामगाव येथे राष्ट्रवादीच्या विद्या अरुण बडधे विजयी झाल्या. रावतळे-कुडगाव येथे राष्ट्रवादीच्या चंद्रकला नवनाथ कवडे, जोहरापूर येथे सरपंचपदी राष्ट्रवादीच्या स्नेहल रोहन लांडे यांनी बाजी मारत ५ जागा मिळविल्या. रांजनी येथे सरपंचपदी राष्ट्रवादीचे काकासाहेब मुरलीधर घुले विजयी झाले. दहिगाव-ने येथे सुनिता देवधान कांबळे यांनी विजय मिळविला.
वाघोली सरपंचपदी भाजपचे सुष्मीता उमेश भालसिंग विजयी झाल्या आणि १० जागा जिंकून उमेश भालसिंग गटाने सत्ता ताब्यात ठेवली. अमरापूर येथे भाजपच्या आशा बाबा गरड विजयी झाल्या. सुलतानपुर येथे सरपंचपदी भाजपच्या डॉ. सविता विजय फलके यांनी विजय मिळविला. आखेगाव येथे जनशक्तीच्या अयोध्या शंकर काटे विजयी झाल्या. त्यांच्या गटाला ११ पैकी ५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी गटास ३ व वंचित आघाडीने ३ जागा मिळविल्या. राष्ट्रवादीच्या आजी माजी बलाढ्य नेत्याचे पॅनल पराभूत झाले.
COMMENTS