पुणे / नगर सहयाद्री कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असल्याने त्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहे.खरंतर यामध्ये शरद पवार यांच्या उपस्...
पुणे / नगर सहयाद्री
कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असल्याने त्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहे.खरंतर यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीती बद्दल काय विशेष असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण यामध्ये विशेष बाब म्हणजे शरद पवार हे तब्बल २४ वर्षानंतर पुण्यातील कॉँग्रेसभवन मध्ये येणार आहे. राष्ट्रव शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती.त्यानंतर शरद पवार यांनी कधीही पुण्यातील कॉंग्रेस भवनात पाय ठेवला नव्हता,कॉंग्रेस भवनातील कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती.
२४ वर्षानंतर शरद पवार हे कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहे, यामध्ये कॉंग्रेस भवन येथे हा वर्धापन दिन साजरा होत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्या अशी विनंती कॉंग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांनी केली होती.
शरद पवार यांनी कुठलीही अडचण न सांगता कार्यक्रमाला येण्याचा शब्द दिला आहे त्यानुसार शरद पवार हे सायंकाळी कॉंग्रेस भवनात दाखल होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजेच तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये येणार आहे.
COMMENTS