२८ डिसेंबर रोजी शीझानची पोलीस कोठडी संपत असल्याची बातमी समोर येत आहे. अशा स्थितीत पोलीस न्यायालयाकडे शीझानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
टीव्ही अभिनेत्री आणि शो 'अली बाबा' फेम तुनिषा शर्मा यांचे २४ डिसेंबर रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलीस तपास करत आहे. तुनिषाच्या आईने तिचा सहकलाकार शीझान मोहम्मद खानवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आता २८ डिसेंबर रोजी शीझानची पोलीस कोठडी संपत असल्याची बातमी समोर येत आहे. अशा स्थितीत पोलीस न्यायालयाकडे शीझानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत. आता न्यायालय शीझानविरोधातील पोलिसांची ही मागणी मान्य करते का, हे पाहायचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १८ जणांची चौकशी केली आहे.
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शीझान खान पोलिस कोठडीत आहे, मात्र हे प्रकरण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचताना दिसत नाही. दुसरीकडे, तुनिषाचे कुटुंब आपल्या मुलीला न्याय देण्याच्या मागणीवर ठाम आहे. या प्रकरणात लव्ह जिहादचाही संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हे कारण पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. चार-पाच डॉक्टरांच्या उपस्थितीत तुनिषाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि तिची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. तुनिषाच्या मृत्यूनंतर ती गर्भवती असल्याची अफवा पसरली होती, मात्र ती पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावली होती.
COMMENTS