मुंबई / नगर सहयाद्री- रविवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत शाहरूख खान कटारा येथे देवीच्या दर्शनासाठी दिसून बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची ईश...
रविवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत शाहरूख खान कटारा येथे देवीच्या दर्शनासाठी दिसून बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याची ईश्वरावरील श्रद्धा सर्वश्रुत आहे. शाहरूख खानने नुकतीच मक्का येथील यात्रा केली. तर रविवारी रात्री तो अचानक कटारा येथील वैष्णोदेवीच्या मंदिरात दिसून आला.
पुढच्या महिन्यात शाहरूख खानचा पठान हा चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपट यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना त्याने वैष्णोदेवीला केली असणार.
पठान चित्रपटाच्या माध्यमातून किंग खान बॉलिवूडमध्ये तब्बल चार वर्षानंतर एंट्री करतोय. त्यामुळे शाहरूख खानच्या लाखो चाहत्यांना चित्रपटाकडून मोठ्या अपक्षे आहेत. चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हापासून चित्रपटासंबंधी प्रत्येक अपडेटवर चाहते व्यक्त होत आहेत.फोटोतला शाहरूख खानचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. केसांची पोनी आणि गळ्यात लांब सिल्व्हर रंगाची चेन आणि पठानी लूकचा हा फोटो चाहत्यांकडून वेगाने शेअर केला जातोय. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.
COMMENTS