निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री नगर शहरात चौकाचौकात वाहतुकीच्या नियमांचे पालन होत ...
निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
नगर शहरात चौकाचौकात वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने दररोज मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रमुख चौकात सिग्नल सुरु करणे अत्यावश्यक आहे. तसेच नव्याने झालेल्या उड्डाणपूलाखालीही मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये व उड्डाणपुला खालील चौकांमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल यंत्रांना सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले.
यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे सचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संतोष गेनाप्पा, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, गिरीश जाधव, योगीराज गाडे, गौरव ढोणे, जालिंदर वाघ आदी उपस्थित होते.यश पॅलेस चौक ते डी.एस.पी. चौक पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु शहरात व उड्डाणपुला खालील खांब व अपुर्या पोलीस यंत्रणेमुळे वाहतूक सुरळीत होत नसून अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तरी यश पॅलेस चौक, स्वस्तिक चौक, माळीवाडा बस स्टैंड, कोठी चौक, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, कोठला स्टॅड याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली तर होणारे अपघात व वाहतुकीची कोंडी टळेल व वाहतूक देखील सुरळीत चालू राहील. असेही यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहेपोलीस अधीक्षक कार्यालय शहर वाहतूक शाखा यांच्या कडून २० मे रोजी शिवसेनेस मिळालेल्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे कि, उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरु करणे योग्य राहील. आता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे, त्यामुळे त्वरित सिग्नल यंत्रणा वरील ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
COMMENTS