नगर तालुक्यातील नवनिर्वाचित भाजपच्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री लोकनियुक्त सरपंचांनी सदस्यांना विश्वासात घेऊन गावा...
नगर तालुक्यातील नवनिर्वाचित भाजपच्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार
अहमदनगर | नगर सह्याद्रीलोकनियुक्त सरपंचांनी सदस्यांना विश्वासात घेऊन गावात विकासाची कामे करावीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात टक्केवारीचा कारभार सुरू होता मात्र तुम्हाला आता विकास कामासाठी टक्केवारी द्यावी लागणार नाही. महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीचे राजकारण केले मात्र आम्ही विकासाचे राजकारण करत असल्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षाचे सरपंच व सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त नारळ फोडण्याचे काम केले आता भाजप सरकारच्या काळात विकास कामांना गती दिली जाईल असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.
नगर तालुयातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार माजी मंत्री शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले, नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अभिलाष घिगे, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, भाऊसाहेब बोठे, विलास शिंदे, दत्ता नारळे, राम पानमळकर, संभाजी पवार, श्याम घोलप, अनिल करंडे, दिलीप भालसिंग, शंकर साठे, रवींद्र कडूस, अनिल लांडगे, अरुण होळकर, संजय गिरवले आदीं सह मोठ्या संख्येने नगर तालुयातील विविध गावातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.
माजी मंत्री कर्डिले म्हणाले की नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये महाविकास आघाडीचे पानिपत करीत २७ पैकी २५ ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला आहे. जनतेच्या सुख दुःखामध्ये आम्ही सामील होऊन काम करतो. विकास कामांना गती देतो. त्यामुळे जनता आमच्यावर प्रेम करत आहे. नगर तालुका आमचे कुटुंब म्हणून काम करतो. मी माजी आमदार आहे मात्र आमदार असताना जी कामे केली जात होती ती कामे मी आज आमदार नसतानाही करतो. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदार यांचे सहकार्य लाभते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांना ५० हजार रुपये कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र ती अमलात आणली नाही. मात्र भाजपने नगर जिल्ह्यातील ९९ हजार शेतकर्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा केले आहे. जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने परिवर्तन करून दाखवले आहे. पुढील काळात येणार्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एक दिलाने काम करून भाजपाची सत्ता स्थापन करावी जेणेकरून या माध्यमातून विकासाच्या प्रश्नांना गती मिळेल असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी प्रास्ताविक केले.
COMMENTS