बीड / नगर सह्याद्रि विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू झाला.नंतर नातेवाईक आणि गावकरी आक्रमक झाले आहेत.महावितरणचे अधिकारी आण...
बीड / नगर सह्याद्रि
विजेचा शॉक लागून टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू झाला.नंतर नातेवाईक आणि गावकरी आक्रमक झाले आहेत.महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता आणि इंस्टाग्रामवर देखील त्याला लाखो फॉलॉवर्स आहेत. मात्र त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संतोषनं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.गावरान बाज आणि अस्सल गावरान साज यांचा मेळ संतोषच्या टिकटॉक व्हिडीओंमध्ये चाहत्यांना पाहयला मिळायचा.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोषनं आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. संतोष मुंडे आणि बाबुराव मुंडे हे दोघेजण जनावर घेऊन शेतात जात असताना विजेच्या रोहित राजवळ गेलेल्या जनावरांना परत आणण्यासाठी गेलेल्या बाबुराव मुंडे यांना उघडे असलेल्या डीपी चा शॉक लागला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या संतोष मुंडेचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महावितरणच्या कारभारामुळेच या दोघांचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
COMMENTS