मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन तिच्या सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्...
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असण्यासोबतच सनी लिओन तिच्या सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत काम करायची. तिच्या थेट अभिनेत्री म्हणून येण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्री सोडली. बॉलिवूडमधील अपयशानंतर सनी लिओनी सध्या साऊथमध्ये नशीब आजमावत आहे. सनीचा हॉरर कॉमेडी तमिळ चित्रपट ओ माय घोस्ट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. युवन यांनी केलं आहे. ओ माय घोस्टमध्ये सनीसोबतच दक्षिणेतील सतीश आणि योगी बाबूसारखे दिग्गज कलाकार आहेत. सनी भूतकाळातील योद्धा राणीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ओ माय घोस्टच्या प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना सनीने मोठा खुलासा केला. एकेकाळी ती भारतात यायला खूप घाबरत होती, कारण तिला अनेक धमया आणि घृणास्पद ईमेल येत असत. भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच माझा तिरस्कार करणार्या लोकांशी माझा सामना झाला होता, असे ती म्हणाली. हा माझ्यासाठी खूप भीतीदायक अनुभव होता. या सर्व गोष्टींमध्ये तिने आपलं नाव करनजीत कौर वोहरा वरून बदलून सनी लिओन ठेवण्याचा निर्णय घेतला. पेंटहाऊस मासिकाचे माजी प्रकाशक, बॉब गुचौने यांनी तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला. २०११ मध्ये सनी लिओनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. धमयांचा इतकाच परिणाम झाला की, बिग बॉसची ऑफर पहिल्यांदा सनीने नाकारली होती.
COMMENTS