संगमनेर । नगर सह्याद्री मोठ्या समृद्ध नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेने कायम जिल्ह्यातील शेतकरी, गोरगरीब यांना मोठी मदत केल...
संगमनेर । नगर सह्याद्री
मोठ्या समृद्ध नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेने कायम जिल्ह्यातील शेतकरी, गोरगरीब यांना मोठी मदत केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान असल्याचे गौरवद्गार काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर, श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, अंबादास पिसाळ, बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, संतोष हासे, दादासाहेब मुंडे, रामदास वाघ, सोमेश्वर दिवटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अनेक वर्ष जिल्हा बँकेमध्ये काम केले. बिहानी कुटुंबीयांच्या या जुन्या जागेत शेतकर्यांना 200 ट्रॅक्टर एकाच वेळी देण्यात आले होते. शेतकरी व गोरगरिबांच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय जिल्हा बँकेने घेतले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात या बँकेचे मोठे योगदान आहे. आज राज्यामध्ये अहमदनगर जिल्हा बँक ही अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते.
सुमारे दहा हजार कोटींच्या ठेवी बँकेत असून बँकेने कायम राजकारण विरहित उत्कृष्ट काम करताना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने शेतकर्यांना कर्ज दिले आहे. संगमनेर तालुक्याने कर्ज परतफेडीची परंपरा कायम जपताना सातत्याने कर्ज वसुली दिली आहे. यावर्षी 99.80% कर्ज वसुली दिली आहे. तर 1000 कोटींच्या ठेवी तालुक्यातून बँकेत आहेत. मोठ्या कष्टातून संगमनेर तालुका हा आर्थिक संपन्न झाला असल्याचे ही ते म्हणाले. तर आमदार डॉ तांबे म्हणाले की, जिल्हा बँक व सहकार हा ध्यास घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर काम केले. सशक्त सहकार निर्माण करताना त्यांनी अनेक आदर्श तत्व सहकारात रुजवली आणि म्हणून सहकाराचा जिल्हा ही ओळख अहमदनगर जिल्ह्याची आज राज्यामध्ये झाली आहे.
माधवराव कानडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सहकारी बँकेचे काम हे अत्यंत पारदर्शक व उत्कृष्टपणे सुरू आहे. आगामी काळात खाजगीकरणाला टक्कर देण्यासाठी सहकार व या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सज्ज राहावे लागणार आहे. जिल्हा बँक ही नेहमी मातृसंस्था म्हणून भूमिका बजावत असून पक्षीय जोडे बाजूला ठेवून शेतकरी हिताचे निर्णय या बँकेने सातत्याने घेतले आहेत.
याप्रसंगी गणपतराव सांगळे बाळासाहेब साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी किशोर टोकसे, गजेंद्र अभंग, सुनंदाताई दिघे, जावेद शेख, विलास कवडे, मुरली अप्पा खताळ, डीबी राठी, विश्वनाथ राठी, बिहानी, प्रकाश कलंत्री, आर.बी. राहणे, मोहनराव करंजकर, वसुली अधिकारी उल्हास शिंदे, शाखा अधिकारी चांगदेव ढेपे, प्रकाश कडलक आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी आभार मानले.
COMMENTS