संगमनेर । नगर सह्याद्री गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणार्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा...
संगमनेर । नगर सह्याद्री
गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणार्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला असून महोत्सवाअंतर्गत झालेल्या स्वरामृत कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे गायन व वादन संस्मरणीय ठरले असून यामुळे अमृतवाहिनीतील सर्व वातावरण संगीतमय झाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी संस्थेतील सर्व विभागांनी राज्य व देश पातळीवर गुणवत्तेने लौकिक मिळवला आहे. संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा मेधा महोत्सव महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला आहे. यामध्ये मागील पाच वर्षात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत महोत्सवात सहभागी झाले आहेत.
गायन व वादनासाठी स्वरामृत हा स्वतंत्र कार्यक्रम झाला. न्यूडो स्कूलमधील चिमुकलीने गायलेले कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी या भारूडाला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेले विविध गीतांवरील वादन आणि मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मेरे रश्के कमर, यारा तेरी यारी, केसरिया या गीतांना विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतले. इंजिनिअरिंग, कॉलेज, पॉलिटेक्निक, फार्मसी, डी फार्मसी, आयटीआय, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल यामधील विविध विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी केलेले वैयक्तिक, समूह गायन, विविध वाद्यांचे वादन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
याप्रसंगी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतर्फे गायन व वादन कलेची स्वरामृत म्युझिकल नाईट झाली. यावेळी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, झी मराठी सारेगमपचा उपविजेता सारंग भालके, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम. लोंढे, मेधाचे समन्वयक जी. बी. काळे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, अंजली कन्नावार, सुनिला मनोज कुमार, स्नेहल शेकदार, डंग मॅडम, प्रा. विलास शिंदे, प्रा. वाळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य जोशी यांनी केली. सूत्रसंचालन आशिष वर्पे यांनी केले.
सारंग भालके ने जिंकले सर्वांची मने
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प चा उपविजेता सारंग भालके यांनी केसरीया, यारीया, लखाबाई पोतराज आला भेटीला ही विविध गीते गायली, वादन आणि गायन करून उपस्थित सर्वांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली.
COMMENTS