समलैंगिक विवाह भारताच्या संस्कृती आणि परंपरेसाठी समलिंगी विवाह योग्य ठरणार नाही, असे सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
भारतात समलैंगिक विवाहाच्या कायदेशीरतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. याआधी मंगळवारी भाजप खासदार सुशील मोदी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी समलैंगिक विवाह भारतीय संस्कृतीच्या विरोधात म्हटले आहे. भारताच्या संस्कृती आणि परंपरेसाठी समलिंगी विवाह योग्य ठरणार नाही, असे सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
सुशील मोदी म्हणाले की, 'काही कार्यकर्त्यांनी समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिल्यास ते योग्य ठरणार नाही. आधी समलैंगिक विवाहाबाबत संसद आणि लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे. कारण, समाज ते स्वीकारायला तयार नाही. याशिवाय मुलींच्या लग्नाचे वय सर्व धर्मात सारखेच असावे, असेही ते म्हणाले.
COMMENTS