पारनेर | नगर सह्याद्री समाजही शिक्षणाचे साधन असून विविध क्षेत्रातील आदर्श निवडून त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन शिक्षण उपनिरीक्ष...
समाजही शिक्षणाचे साधन असून विविध क्षेत्रातील आदर्श निवडून त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात यांनी केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन इसळकचे ग्रामदैवत श्री रामलिंग तीर्थ देवस्थान ४ या ठिकाणी झाले. कार्यक्रमासाठी इसळकचे माजी सरपंच संजय गेरंगे यांनी सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष माजी आमदार दादाभाऊ कळमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इसळकच्या सरपंच छायाताई संजय गेरंगे, उपसरपंच शोभाताई खामकर, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे संचालक माजी प्राचार्य पोकळे, ग्रामीण विकास मंडळ संस्थेचे सचिव बबनराव कातोरे, प्राचार्य रावसाहेब सातपुते, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख सतिश बनसोडे, क्रीडा शिक्षक बांडे, मच्छिंद्र सुखदेव निमसे आदी उपस्थित होते. थोरात यांनी शैक्षणिक आणि सामाजिक विचारवंतांचे विद्यार्थ्यांनी अनुयायी होण्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यासावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी आपला विद्यालय परिसर, आपले गाव आपण स्वतःच स्वच्छ करावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन, वाचन, लेखन अशा विविध क्षेत्रात स्वतःला गुंतवून स्वविकासावर भर द्यावा. समाजातील योग्य आदर्श निवडण्यासाठी ज्ञानाचा तिसरा डोळा उघडण्यासाठी प्रयत्न करावे. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी हेमंत पवार यांनी केले. प्राचार्य रावसाहेब सातपुते यांनी राष्ट्रीय सेवा योजनेबाबत माहिती उपस्थितांना दिली.
COMMENTS