शिर्डी / नगर सहयाद्री देशभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सुद्धा सज्ज झालं आहे.शिर्डीतील हॉटेल्स, लॉजिंग यासह साई ...
शिर्डी / नगर सहयाद्री
देशभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सुद्धा सज्ज झालं आहे.शिर्डीतील हॉटेल्स, लॉजिंग यासह साई संस्थानचे भक्तनिवास देखील हाऊसफुल असल्याचे चित्र आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर सुद्धा गर्दी होताना दिसत आहे.
३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता साई भक्तांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. भक्त निवास शेजारी असणाऱ्या मोठ्या मांडवात एक हजार भक्त एकाच वेळी राहू शकतील अशी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.अत्यल्प दरात चहा, नाष्टा तसेच मोफत भोजनाची व्यवस्था देखील साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
या ठिकाणी अवघ्या पाच रुपयात गादी तर ५ रुपयात चादर मिळणार आहे.त्यामुळे अगदी २० रुपयांत साईभक्त शिर्डीत नवीन वर्षांची सुरुवात साई दर्शनाने करू शकणार आहे. साई संस्थानने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे साईभक्तांनी देखील समाधान व्यक्त केला आहे.
COMMENTS